भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपालांना सभागृह सोडावे लागले – जयंत पाटील


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । मुंबई । भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही असेही जयंत पाटील म्हणाले. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला. फलकं झळकवली त्यामुळे राज्यपाल महोदय राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!