खुल्या जागा वाढल्याने पालिकांमध्ये चुरस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर व पाचगणी या पालिकांसाठी सोमवारी (दि. १३) आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे आठ पालिकांमधील २११ पैकी तब्बल १८१ जागा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने यंदाच्या निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यासह जिल्ह्यातील आठ पालिकांचा आरक्षण सोडत व प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी त्या-त्या पालिका कार्यक्षेत्रात सदस्यपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. काही पालिकांमध्ये इच्छुकांच्या अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडले तर काही ठिकाणी अनेकांचा भ्रमनिरास झाला.

सातारा पालिकेच्या २५ प्रभाग व ५० जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. अनुसूचीत जाती, जमातीच्या ७ जागा वगळता ४३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील प्रतिस्पर्धी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीत रंगतदार सामना पहायला मिळणार आहे. वाई शहरातील पूर्वीच्या १० प्रभागांमध्ये वाढ होऊन ही संख्या आता ११ वर पोहचली आहे. तसेच नगरसेवकांची संख्याही २० वरून २३ इतकी झाली आहे. २३ पैकी १२ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
महाबळेश्वर पालिकेच्या एकूण १० प्रभागांमधील २० सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच

प्रभाग ५ हा अनुसूचीत जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. आरक्षणामुळे काहींचा फायदा तर काहींची गोची झाली आहे. पाचगणीच्या आरक्षण सोडतीने ‘कही खुशी, कहीं गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मनासारखे आरक्षण न पडल्याने काहींना पूर्वीचा व हक्काचा प्रभाग आरक्षणामुळे गमवावा लागणार आहे. अशा उमेदवारांना आता इतर प्रभागातून नशीब आजमवावे लागणार आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाºया फलटण पालिकेच्या १३ प्रभागातील २७ उमेदवारांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. पालिकेत यंदा २३ उमेदवार खुल्या गटातून निवडून जाणार आहेत. त्यामुळे फलटण पाालिकेत इच्छुकांची संख्या वाढणार आहे.
रहिमतपूर पालिकेत यंदा खुल्या जागा वाढल्या. खुल्या गटातून महिला व पुरुष मिळून एकूण १८ उमेदवार पालिकेत निवडूण जाणार आहेत. आरक्षणामुळे इच्छुकांची चांदी झाली असून, अनेकांनी मोर्चबांधणीला सुरूवात केली आहे. म्हसवड पालिकेच्या २० जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यापैकी १७ जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्या.

पालिका प्रभाग सदस्यसंख्या खुल्या जागा
सातारा २५, ५०, ४३
फलटण १३, २७, २३
कºहाड १५, ३१, २७
वाई ११, २३, २०
महाबळेश्वर १०, २०, १७
पाचगणी १०, २०, १६
रहिमतपूर १०, २० १८
म्हसवड १०, २०, १७
एकूण — २११ १८१

कऱ्हाडात इच्छुकांचा भ्रमनिसास
नव्या प्रभाग रचनेनुसार कऱ्हाडात १५ प्रभाग गठित केले आहेत. या प्रभागातून ३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्याने अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ५ येथे खुल्या पुरुष प्रवर्गाचे आरक्षणच न पडल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. सोडतीनंतर इच्छुकांच्या चेहºयावर कही खुशी कही गम, असे भाव पाहायला मिळाले.


Back to top button
Don`t copy text!