संविधानामुळे देशातील सर्व जातीधर्माला समान वागणूक – अनुप शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
देशाला सार्वभौमत्व हे संविधानाने मिळाले असून सर्व जातीधर्माला बरोबर नेण्याचे काम संविधनामुळे होत आहे, असे विचार अनुप शहा यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी, फलटण आयोजित ‘संविधान दिन’ कार्यक्रमप्रसंगी शहा बोलत होते.संविधान दिनानिमित्त भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्याचा व ‘संविधान भेट’चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अनुप शहा यांच्या हस्ते घटनाकार डॉ. आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधानची प्रत शहरातील मान्यवरांना भेट देण्यात आली.

कार्यक्रमासाठी यावेळी भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हा प्रतिनिधी सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, रियाज भाई इनामदार, राजेंद्र निंबाळकर, मेहबूबभाई शेख, वसीम मनेर, राहुल शहा, संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!