श्रीमंत रामराजेंमुळे संपूर्ण जिल्ह्यात फलटणला सर्वाधिक निधी : आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२२ । फलटण । विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक योजना व निधी ह्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मंजुर करण्यात आलेला आहे, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्यातील धुळदेव, अलगुलेवाडी, सोमंथळी, होळ, खामगाव व वाठार निंबाळकर या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ३२२ कोटींची पाणीपुरवठा साठीची कामे मंजुर झाली आहेत. यामधील काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तर काहींची कामे ही कार्यान्वित आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी योजना ही धुळदेव व अलगुलेवाडीसाठीची ही योजना आहे. यामुळे दोन्ही गावांच्या दोन महिने पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामस्थांची होणार आहे. यामुळे कॅनोल बंद झाला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात उद्भवणार नाही. श्रीमंत रामराजेंच्यामुळे फलटण तालुका हा पुर्णपणे ओलीताखाली आला आहे. शुध्द पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्य हे निरोगी राहू शकते. रामराजेंच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त फलटणमध्ये योजना मंजुर करण्यात आलेल्या आहेत, असे ही यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी गेले पाहिजे हे राज्य व केंद्र सरकारचे धोरण आहे. कितीही पैसे गेले तरी सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ पाणी गेले पाहिजे. ह्या योजनेसाठी बरेचस्या बैठका जिल्हा परिषद, पंचायत समिती व गाव स्तरावर झालेल्या आहेत. ह्या योजनेमध्ये निम्मा वाटा हा राज्य सरकारचा आहे व निम्मा वाटा हा केंद्र सरकारचा आहे. ह्या योजनेसाठी धुळदेव व सोमंथळी गावकर्यांनी श्रीमंत रामराजेंना मागितल्यावर त्यांनी तातडीने स्वतःची जमीन विनामोबदला उपलब्ध करून दिली. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणार्या सर्व ठिकाणच्या योजना ह्या उच्च प्रतीच्या बनवल्या जातील, असा विश्वास यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना ह्या मंजुर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार फलटण तालुक्यामधील ज्या ठिकाणी ह्या योजना मंजुर करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी उच्च प्रतीचे कामकाज ठेकेदार करतील. अशा स्पष्ट सुचना ह्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे यावेळी जीवन प्राधिकरणचे अभियंता श्री. संत यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती शंकर माडकर (अप्पा), दत्तात्रय गुंजवटे, माजी उपसभापती संजय सोडमिसे, जलजीवन मिशनचे श्री. संत, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!