समर्थमुळे साताऱ्याचा झेंडा सातासमुद्रापार; आ. शिवेंद्रसिंहराजे; योगा स्पर्धेत उल्लेखनीय यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९: आपला सातारा प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. शिक्षणाबरोबरच विविध क्रीडाप्रकारात साताऱ्यातील असंख्य खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन जागतिक योगा स्पर्धेत साताऱ्यातील समर्थ सुशांत सपकाळ या १२ वर्षाच्या मुलाने उल्लेखनीय कामगिरी करून दुसरा क्रमांक पटकावला असून समर्थमुळे साताऱ्याचा झेंडा अटकेपार फडकला आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

दिल्ली येथील ४० प्लस हेल्दी लाईफस्टाईल या संस्थेमार्फत जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावरील इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिप या स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. तीन वयोगटात झालेल्या या स्पर्धेत १० ते १८ वयोगटात जगभरातून ५०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. या वयोगटात साताऱ्यातील १२ वर्षाच्या समर्थ पोतदार याने द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल त्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी समर्थचे पालक आणि सातारा पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

समर्थने मिळवलेले यश कौतुकास्पद असून यापुढेही तो चमकदार कामगिरी करेल आणि साताऱ्यासह आपल्या देशाचे नाव जगभरात उज्वल करेल, अशा शुभेच्छा आ. शिवेंद्रसिंहराजे आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!