दुधेबावीत वसुंधरा फौंडेशनच्या वतीने चित्रकला स्पर्धा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील चौंडीवस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये कोळकी येथील वसुंधरा फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.

चौंडीवस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये वसुंधरा फौंडेशन कोळकीच्या वतीने महिला दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र व बक्षीसाचे वितरण यावेळी करण्यात आले.

सदर कार्यक्रमास कोळकी येथील वसुंधरा फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. लता आबाबजी नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापिका सौ. रूपाली सरतापे यांनी केले. यावेळी उपशिक्षीका सौ. जयश्री शंकर खाडे, अंगणवाडी सेविका रूपाली दशरथ चांगण तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. जयश्री नाळे, सौ. दिपाली नाळे , सौ.प्रतिक्षा मोरे, सौ. अमृता धडांबे तसेच महिला पालकवर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!