दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) गावात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जि. प. प्राथमिक शाळा दुधेबावीचे ध्वजारोहण शाळेच्या आवारात गावच्या प्रथम नागरिक सौ. भावना सोनवलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा देत गावातून प्रभात काढली. सदर कार्यक्रमात कृषीदूतांनी सहभाग घेत स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. भावना सोनवलकर होत्या. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपसरपंच सागर भिसे, इतर ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर, कृषीमित्र संजय सोनवलकर, मुख्याध्यापिका अंबिका राजेशिर्के, आजी व माजी स्वातंत्र्यसैनिक व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी देशासाठी सेवा देणार्या ‘जय जवान, जय किसान’ म्हणजेच आजी व माजी कार्यरत असणार्या तब्बल ४१ स्वातंत्र्यसैनिक/पोलीस कर्मचारी व कृषीसंलग्न कृषी महाविद्यालय फलटणचे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कार्यरत विद्यार्थी राजवर्धन दराडे, संकेत तावरे, यश भोसले, रोहित शिंदे, शिवम मेनकुदळे, दिग्विजय फाळके यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कृषीदूतांनी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कार्यरत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचा समारोप सरपंच भावना सोनवलकर यांच्या भाषणाने झाला. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.