
स्थैर्य, दुधेबावी, दि. २९ ऑक्टोबर : येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित संत गाडगे महाराज व्याख्यानमालेतर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी ही घोषणा केली.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ऋतुजा दादासाहेब पिसाळ यांना ‘क्रीडारत्न’ पुरस्कार, तर बीड येथील किरण दत्तू गायकवाड यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता (समाजरत्न), विशाल भालचंद्र गाडे (कै. पांडुरंग कोंडीबा सोनवलकर कृषिरत्न), इंदापूरचे डॉ. जयदेव ज्ञानदेव काळे (आरोग्यरत्न) आणि कराडचे डॉ. शिवाजीराव ठोंबरे (कै. विठ्ठल बापूजी ठोंबरे साहित्यरत्न) यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर एमएमआरडीएचे सहआयुक्त सचिन भानुदास ढोले (प्रशासनरत्न), नवी मुंबई येथील उद्योजक तुकाराम सोमा सरक (उद्योगरत्न), पोपट उत्तम चव्हाण (कलारत्न) आणि अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, अहिल्यानगर (सहकाररत्न) यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. सागर कराडे, विजयकुमार नाळे व विठ्ठल सोनवलकर यांनी दिली.
या सर्व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण ‘दुधेबावी फेस्टिव्हल’ अंतर्गत होणार असल्याचे प्रतिष्ठानचे पदाधिकारी संतोष भांड, डॉ. युवराज एकळ, सचिन सोनवलकर व कांता सोनवलकर यांनी सांगितले.
