दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रबोधनाचा अखंडपणा प्रेरणादायी,आदर्शवत : तुषार मोहिते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । फलटण । दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचा व्याख्यानमालेचा अखंडपणा निश्चित प्रेरणादायी असून ग्रामीण भागात नवीन पिढीसाठी प्रबोधन चळवळ दिशादर्शक ठरेल असा आत्मविश्वास मुंबईचे सहआयकर आयुक्त तुषार मोहिते यांनी व्यक्त केला.

दुधेबावी ता.फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत तुषार मोहिते बोलत होते. जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता दिग्विजय सोनवलकर ,सातारा जिल्हा मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.नितीन नाळे, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर , दुधेबावी प्रतिष्ठानचे संचालक भानुदास सोनवलकर ,कृषी पर्यवेक्षक आबासाहेब नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तुषार मोहिते म्हणाले,’ उच्च ध्येय प्राप्त करायचे असेल तर महान व्यक्तींचे विचार आत्मसात करण गरजेचे असून कोरोनाच्या काळात खरी माणुसकी समजून आली असून संपत्तीपेक्षा संततीवर आदर्श संस्कार करण काळाची गरज आहे. माणसांनी माणसासारख आपूलकीन वागण आवश्यक असून ज्यांना ध्येय असते त्यांनाच योग्य दिशा मिळत असल्याचे तुषार मोहिते यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात व्याख्यानमाला आयोजित करण प्रेरणादायी बाब असून सातत्य ठेवल्याची बाब तर निश्चितच गौरवास्पद आहे’. असे अधिक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर यांनी सांगून दुधेबावीच्या व्याख्यानमालेचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गेली २० वर्ष जिद्द व चिकाटीने प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी राबवलेली प्रबोधन चळवळ दिशादर्शक आहे.’ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, युवक युवतींना ,शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रतिष्ठान करत असलेले प्रयत्न मोलाचे असल्याचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांनी सांगितले. यावेळी दुधेबावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सोसायटीचे चेअरमन श्रीमंत नाळे, दुधेबावीचे उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्या सौ.स्वाती नाळे , वसुधरा फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.लता नाळे, सौ.रूपाली नाचण, जयवंत तांबे सर , डॉ. युवराज एकळ, सचिन सोनवलकर , संपत सोनवलकर , विठ्ठल सोनवलकर ,कृषी मित्र संजय सोनवलकर , कांता सोनवलकर , सुभाष सोनवलकर , भिमराव नाळे , ह.भ.प.महादेव सोनवलकर , बाजीराव सोनवलकर ,सुधाकर चांगण,संदीप सोनवलकर ,सुमीत नाळे,लक्ष्मण सोनवलकर ,अक्षय नाळे राहूल सोनवलकर ,धिरज सोनवलकर ,अभिजीत सोनवलकर ,पोपटराव सोनवलकर , सुमीत नाळे ,सुरेश सोनवलकर ,तात्याबा सोनवलकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ.सागर कराडे यांनी केले. सुत्रसंचालन सचिन सोनवलकर यांनी केले. आभार विजयकुमार नाळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!