
दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । फलटण । नर्मदा परिक्रमा पूर्ण करुन अध्यत्मिक क्षेत्रातील अभ्यासाबरोबर देशाच्या विविध प्रांतातील जनजीवन, धार्मिक क्षेत्रे, पुरातन वास्तू विशेषतः मंदिरे यांना प्रत्यक्ष भेटी देवून संजय जामदार यांनी फलटणच्या सामाजिक क्षेत्रातील आम्हा सर्वांना एक वेगळा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याचे प्रतिपादन दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले आहे.
दै. सकाळ जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार संजय जामदार यांनी सायकलवरुन १०० दिवसात सुमारे ५५०० कि. मी. प्रवास करुन नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली त्यानिमित्त संजय जामदार यांच्या निवासस्थानी जाऊन जामदार कुटुंबियांसमवेत संजय जामदार यांचा दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचयवतीने यथोचित सत्कार केल्यानंतर शशिकांत सोनवलकर बोलत होते.