दैनिक स्थैर्य | दि. ५ जून २०२३ | फलटण |
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाने शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत असतानाही कार चालवली. कार चालवत असताना त्याने दत्तनगर फलटण येथे दोन बालकांना उडवले असल्याचे समजते. या घटनेनंतर नागरिकांनी त्या कारला अडवले असता कारमध्ये दारू रेचत हा पोलिस अधिकारी गाडी चालवत असल्याचे नागरिकांच्या निर्दशनास आले. हा प्रकार पाहून संतप्त जमावाने या पोलीस निरीक्षकाला बेदम चोप दिला असल्याची चर्चा आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये हा पोलीस अधिकारी कार्य बजावत असतानाही अनेकवेळा गैरहजर असायचा. यावेळी हे पोलिस निरीक्षक आपले कर्तव्य सोडून दारूच्या नशेत बाहेर फिरत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत या पोलिस निरीक्षकाने दोन बालकांना उडवल्यामुळे संतप्त नागरिकांच्या हाती तो लागला आणि त्यास बेदम चोप पडल्याचे समजते.
दारूच्या नशेत कार चालवणार्या आणि दोन बालकांना उडवणार्या या पोलीस अधिकार्यावर फलटण शहर पोलीस कोणती कारवाई करणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.