सुशांत केसमध्ये ड्रग्स अँगल : छापेमारीनंतर मुंबईतून 5 लोकांना एनसीबी टीमने केली अटक, 1 लाखांची ड्रग्स आणि 4 लाख कॅश हस्तगत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१८: सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात कारवाई सुरू आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे.

या पाच जणांच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक नामवंतांची नावे समोर येऊ शकतात. यापूर्वी रिया चक्रवर्तीनेही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावेही उघड केली आहेत. परंतु, एनसीबीने त्यापैकी कोणालाही समन्स बजावले नाही.

ताब्यात घेतलेल्या राहिल विश्रामचे बॉलिवूड कनेक्शन


एनसीबीचे ज्वाइंट डायरेक्टर समीर वानखेडेंनुसार, ‘एनसीबी मुंबईने हिमाचल प्रदेशातून एक किलो चरससोबत ड्रग्स पेडलर राहिल विश्रामला ताब्यात घेतले आहे. एनसीबीने त्याच्याकडून 4.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील संबंधीत इतर पेडलर्ससोबत त्याचा संबंध आहे.’असे बोलले जात आहे की, राहिल विश्रामचे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणासंबंधीत ड्रग्स तस्करांशी थेट संबंध आहेत. राहिलचे अनुज केसवानी, कैझान आणि शोविक चक्रवर्ती यांच्याशी थेट असल्याचे समोर आले आहे.

ड्रग पेडलर सूर्यदीपला आज न्यायालयात हजर करणार

मुंबई येथून अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर सूर्यदीप मल्होत्राला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीने मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्याशी संबंध ठेवल्याबद्दल सूर्यदीपला अटक केली होती. असे म्हटले जाते की महाविद्यालयीन काळापासून सूर्यदीप शौविकचा चांगला मित्र होता. सूर्यदीप मल्होत्रा ​​मुंबईतील सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!