स्थैर्य, दि.२३: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोेण आणि नम्रता शिरोडकर यांच्यानंतर आता दीया मिर्झाचे नाव समोर आले आहे. वृत्तानुसार, ड्रग पेडलर अनुज केशवानीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या चौकशीत 38 वर्षीय दीया मिर्झाच्या नावाचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट्सनुसार अनुज केशवानीने एनसीबीला सांगितले की, दीया मिर्झाची मॅनेजर ड्रग्ज खरेदी करत असे. 2019 मध्ये दीयाच्या मॅनेजरने ड्रग्ज खरेदी केल्याचे पुरावेही केशवानीने दिले आहेत. त्यामुळे एनसीबी दीयाला समन्स पाठवू शकते. मात्र या प्रकरणात नाव आल्यानंतर कुठलीही कारवाई होण्यापूर्वी दीयाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावरील सर्व आरोप तिने फेटाळून लावले आहेत.
दीयाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दिया म्हणाली, ‘माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते. हे आरोप खोटे, निराधार आणि वाईट प्रवृत्तीतून करण्यात आले आहे. अशा पत्रकारितेचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल. मी खूप मेहनतीने उभे केलेले माझे करिअर यामुळे उद्धवस्त होईल. मी माझ्या आयुष्यात कधीच ड्रग्ज खरेदी केले नाही आणि त्याचे सेवनही केलेले नाही,’ असे दीया म्हणाली आहे.
सोबतच तिने आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभारदेखील व्यक्त केले आहेत.