निनाममधील युवकाचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागठाणे, ता. 17 : निनाम (ता. सातारा) येथील युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. काल सायंकाळी विहिरीत बुडालेल्या या युवकाचा मृतदेह आज दुपारी बाहेर काढण्यात पोलिस तसेच मदत पथकाला यश आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बाळासाहेब वायदंडे (वय 26) असे या युवकाचे नाव आहे. काल सायंकाळी तो जोतिबाचा माळ नावाच्या शिवारातील विहिरीत पोहायला गेला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. मात्र मित्र लगेचच तिथून निघून शेतात गेला. रात्री उशिरा आकाश घरी न परतल्यामुळे त्याचा शोध सुरु झाला. आज सकाळी बोरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, रामचंद्र फाळके, स्वप्नील माने तसेच अब्दुल सुतार, अजीम सुतार, सुहेल सुतार, चंद्रसेन पवार, गणेश निपाणे, देवा गुरव आदींनी आकाशचा शोध घेतला. मात्र यश आले नाही. त्यानंतर साताऱ्याहून शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमलाही बोलाविण्यात आले. अखेर आज दुपारी सव्वा तीन वाजता आकाशचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

तो पुण्यात नोकरीला होता. लाॅकडाउन काळात तो गावी आला होता. त्याच्या घरी आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ असा परिवार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!