बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०८:  बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. ४ जून ते ३ जुलै २०२१ या कालावधी दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम 188 भा.दं.वि. 1860 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!