
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ‘चालक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी फलटण शहरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक श्री. मारुती चौगुले यांनी सर्व उपस्थित चालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. मारुती चौगुले म्हणाले, “दळणवळण व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, चालक हा या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चालकांनी आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. आप्पा ननवरे यांनी केले. त्यांनीही आपल्या मनोगतात सर्व रिक्षा चालकांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. महेंद्र काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष श्री. सनी कदम, माजी अध्यक्ष श्री. महेंद्र काकडे, सचिव श्री. उदय काकडे, तसेच सर्वश्री उमेश अहिवळे, राजेंद्र काकडे, निलेश रिटे, योगेश पोरे, गणेश काकडे, राजेंद्र देशमुख, संजय मोरे, राहुल पवार, आनंद जगताप, पप्पू भोसले, अशोक जाधव, बाळासाहेब कांबळे, राजू माने, भानुदास टाळकुटे, बिलाल शेख यांच्यासह अनेक चालक उपस्थित होते.