ड्रिमर्स पी. आर. कंपनी करतेय नव्या वर्षाची नव्या लोगोसह सकारात्मक सुरूवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१२:  मराठी सिनेसृष्टीतील पहिली टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी, ड्रिमर्स पी. आर. अॅंड मार्केंटींगला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. ३ जानेवारी २०१४ रोजी या कंपनीची स्थापना झाली. ही कंपनी, मार्केटींग, पी. आर., सोशल मिडीया आणि प्रोग्राम मॅनेजमेंट अशाप्रकारच्या सर्विसेस देत आली आहे. आणि या नव्या वर्षापासून ही कंपनी ब्रॅंड फिल्म्स, कॉर्पोरेट एवी आणि डिजीटल मार्केटींग या देखील सर्विसेस सुरू करत आहे. वर्धापनदिन आणि नविन वर्षाचं औचित्य साधून कंपनीच्या नव्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले आहे.
निर्माते दीपक पांडुरंग राणे हे ड्रिमर्स पी. आर. अॅंड मार्केटींग कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, खारी बिस्किटसारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली आहे. ड्रिमर्स पी. आर. अॅंड मार्केटींग ही कंपनी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचे, दर्जेदार सिनेमांचे आणि उत्कृष्ट ब्रॅंड्सचे प्रमोशन करत आली आहे.
निर्माते आणि कंपनीचे संस्थापक दीपक पांडुरंग राणे नव्या लोगोविषयी सांगतात, ” नव्या वर्षाची सुरूवात सकारात्मक करण्याच्या उद्देशाने आम्ही ड्रिमर्स पी. आर. अॅंड मार्केंटींगच्या नव्या लोगोचे अनावरण करत आहोत. तसेच आज तुमच्या साथीने या कंपनीने ७ वर्षाचा यशस्वी टप्पा पार केला. या संपूर्ण प्रवासात ह्या कंपनीशी अनेक नामवंत मंडळी संलग्न झाली. ही कंपनी प्रत्येक क्लायंट किंवा ब्रॅंडचे नाव कशाप्रकारे नावारूपाला येईल याकडे काटेकोरपणे लक्ष देत असते. यावर्षापासून आम्ही मनोरंजन क्षेत्रासहित कॉर्पोरेट जगातही पाऊल ठेवत आहोत. या नव्या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम असचं आमच्या पाठीशी असू देत. हीच सदिच्छा.”

Back to top button
Don`t copy text!