निर्माता संघाची दिर्घाक स्पर्धा
आमची पुणे नाशिक कोल्हापूर संभाजीनगर नागपूर अशी केंद्र. परीक्षक विश्वास सोहोनी, गिरीश साळवी आणि डॉ अनिल बांदिवडेकर. सगळे परीक्षक आणि निर्माता संघाच्या वतीने मी असे आम्ही दादर श्री शिवाजी मंदिर येथून निघालो. तसं मी सोहोनी आणि साळवी यांना थोडंफार ओळखत होतो. डॉ ना भेटण्याची पहिलीच वेळ स्पर्धे दरम्यान डॉक्टरांन बरोबर चांगलीच गट्टी जमली. पुढे तीनवर्ष आम्ही स्पर्धे निमित्ताने एकत्र होतो. नाटक इतिहास भूगोल नागरिकशास्त्र बी एम सी कशावरही डॉ उत्तम बोलायचे. शंका निरसन करायचे मार्गदर्शन करायचे खरंतर डॉ च्या अचाट आणि अफाट कर्तृत्व कार्याला माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण आज हे लिहिताना माझी गत मोरया मोरया मी बाळ तान्हे…तुझीच पूजा करू काय जाणे अशी आहे. एके दिवशी डॉ ना फोन केला सर तुम्हाला भेटायचं आहे. शिवाजीला ये …डॉ म्हणाले. मी आणि सौ शिवाजीला पोहोचलो. डॉ ना मी एक ऐतिहासिक गोष्ट ऐकवली आणि यावर नाटक करायची इछा आहे म्हणून सांगितले. तुम्ही हे लिहून दिग्दर्शित करायचे. डॉ नी लगेच होकार दिला दुसरी मीटिंग डॉ ना मी त्या गोष्टीवर जे काही लीहले होते ते दाखवले ते वाचून झाल्यावर डॉ म्हणाले मी फक्त दिग्दर्शन करतो. मग नाटक लिहिणार कोण मी तू डॉ म्हणाले. मग पार्ल्याच्या वाघ बकरी चहा आउटलेट मध्ये त्यांनी अक्षरशः माझ्या हाताला धरुन ते लिहून घेतलं आणि शिस्तबद्ध तालमीत चाळीस नवीन मुलांना घेऊन ते उभं करुन दिलं.
नाटक दर्या भवानी कुठल्याही स्पेसीफिक मानधनाची अपेक्षा न करता. प्रचंड मेहनत घेऊन दिवसाची रात्र करून डॉ नी दर्या भवानी उभं केलं. सगळ्या परीक्षकांनी मराठीतील ऑपेरा नाटक अस त्याच कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे आम्ही थांबलो आहोत. मुळात मराठा आरमार हा नाटकाचा विषय आहे. श्री शिवछत्रपतींचे मराठा आरमार ही सुरुवातीला असंच अडखळत संकटांना तोंड देत उभं राहिलं. पण एकदा का ते स्थिरावल्यावर. ते हिंदुस्थानातील नव्हे जगातील उत्तम आरमार-नेव्ही ठरलं. म्हणून तर आपली नेव्हीत INS शिवाजी आहे INS खांदेरी आहे …तसंच डॉ नी आम्हाला उभं करून दिलेलं दर्या भवानी हे नाटक लॉकडाऊन नंतर रंगभूमीवर संचार करण्यास सिद्ध आहे.
संदीप शशिकांत विचारे