लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । लोणंद । लोणंद नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज नगरपंचायत सभागृहात मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी प्रसिद्ध केल्या.

लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत लोणंद येथील एकुण सतरा प्रभागात १६७४४ मतदारांनी नोंदणी केलेली आहे. नगरपंचायत सभागृहात आज दिनांक २३ रोजी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्याच्या प्रारूप मतदार याद्यांनुसार प्रभाग निहाय एकुण मतदान पुढील प्रमाणे आहे. प्रभाग एक – ११८४, प्रभाग दोन- ६५३, प्रभाग तीन-७८७ प्रभाग चार- १३३७, प्रभाग पाच- ९३९, प्रभाग सहा- ४०१, प्रभाग सात – ७९७, प्रभाग आठ- १४५४, प्रभाग नऊ- १६६९, प्रभाग दहा – १००८, प्रभाग अकरा – ९८४, प्रभाग बारा- ९६०, प्रभाग तेरा- ३९७, प्रभाग चौदा- १६२६, प्रभाग पंधरा ६३६, प्रभाग सोळा – ५६३, प्रभाग सतरा – १३५९, असे सतरा प्रभागात मिळून एकूण १६७४४ मतदार आहेत. सर्वात कमी ३९७ मतदार प्रभाग तेरा मधे आहेत तर सर्वात जास्त मतदार संख्या १६६९ प्रभाग नऊ मधे आहे.
सदर याद्यांवर हरकती वा सुचना दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर पर्यंत नोंदवाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. दिनांक २९ रोजी अंतीम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नगरपंचायतमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी म्हणून सदर याद्या लोणंद येथील निलेश ट्रेडर्स अँन्ड रावळ झेराँक्स सेंटर नगरपंचायत बिल्डींग , एस.टेक. काँप्युटर जाधव आळी , वेदमुद्रा ग्रुप  खंडाळा रोड, महावीर प्रिन्टर्स स्टेट बँक नजीक, प्रसाद कम्युनिकेशन, एस.टी.स्ट्ँण्डजवळ , ओम कँफे, एसटी स्टँण्ड जवळ, कुंभार झेराँक्स तानाजी चौक चावडी जवळ अशा ठिकाणीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!