दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील 15 सहकारी संस्थांचा सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीचा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक पार पाडण्यासाठी या सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डांवर दि. 28 जून 2022 रोजी सकाळी 11 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील तर त्यांनी दि. 28 जून ते दि. 5जुलै 2022 या कालावधीत या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उचित त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात द्याव्यात. या नंतर निर्धारीत पुढील कार्यक्रम सुरु करण्यात येईल, असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सातारा तालुका शंकर पाटील यांनी कळविले आहे.
सहकारी संस्था पुढील प्रमाणे. पंचम टेलिव्हिजन आणि ब्रॉडकॉस्टिंग नेटवर्क सहकारी पतसंस्था मर्या,सातारा. अन्नपुर्णा स्वयंरोजगार सहकारी पतसंस्था मर्या सातारा. गरुडझेप स्वयंरोजगार सहकारी पतसंस्था मर्या सातारा, अनुराधा पव्लिकेशन सहकारी पतसंस्था मर्या सातारा, सेव्हन स्टार कमर्शियल कॉम्प्लेक्स मेंटनन्स सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, श्रीमंत छत्रपती उदयनराजे बोटींग क्लब व पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्या पुनवडी,पो. दहिवडी ता. सातारा, भंडारी रिजन्सी सहकारी पतसंस्था मर्या कोडोली, स्वयंरोजगार, सहकारी संस्था मर्या. मंगळवार पेठ,सातारा. विज मंडळ शिकाऊ उमेदवार स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या. सदरबझार सातारा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्वयंरोजगार नागरी सेवा संस्था मर्या. सदरबझार, सतारा. विठ्ठलदादा कृषी प्रक्रिया सह. संस्था मर्या. पेट्री ता. सातारा. शिवशंकर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. सांबरवाडी, ता. सतारा. संपतराव भोसले कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. मल्हारपेठ, सातारा. ज्ञानसोना सहकारी कृषीमाल प्रक्रीया सहकारी संस्था मल्हारपेठ सातारा. श्री. साई मजुर खाणकामगार सहकारी संस्था मर्या. मंगळवार पेठ, सातारा.