दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील ड वर्गातील 3 सहकारी संस्थांचा सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक पार पाडण्यासाठी या सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थांच्या नोटीस बोर्डावर दि. 18 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील तर त्यांनी दि. 18 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उचित त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात देण्यात यावेत. यानंतर निर्धारीत पुढील कार्यक्रम सुरु करण्यात येईल, असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तालुका यांनी कळविले आहे.
ड वर्गातील संस्थांची नावे पुढीलप्रमाणे : कृषी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था कोंडवे राजदिपनगर, कोंडवे, शिवराज सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. काशिळ व महामाता भिमाई मा. व. शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्या, सातारा.