दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील क वर्गातील 19 सहकारी संस्थांचा सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक पार पाडण्यासाठी या सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थांच्या नोटीस बोर्डावर दि. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील तर त्यांनी दि. 21 ते 27 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उचित त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात देण्यात यावेत. यानंतर निर्धारीत पुढील कार्यक्रम सुरु करण्यात येईल असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तालुका यांनी कळविले आहे.
सातारा तालुक्यातील गट-क मधील 19 संस्थांची नावे पुढीलप्रमाणे. पॅकप्रिल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसा. एम. आय. डी. सी., वनश्री वनखात्यातील पगारदार नोकरांची सहकारी पंतसंस्था मर्या. गोडोली, मुथा इंजिनिरिंग सेवक सह. पतसंस्था मर्या. एम. आय. डी. सी., सातारा जिल्हा भुमि अभिलेख कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा (मुक्ता ना. पतसंस्था), डेक्कन को-ऑप क्रेडिट सोसा. लि. वाढेफाटा खेड (शाहु ना. पतसंस्था), लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, सातारा जिल्हा संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, शकुनी गणेशनागरी सह. पतसंस्था मर्या. सातारा, विजयालक्ष्मी ना. सह. पतसंस्था मर्या. सातारा, माजी सैनिक ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्था मर्या. वर्णे, नवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अतित, अश्र्वमेघ युवक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सतारा, महालक्ष्मी नगरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा मोळाचा ओढा, मराठा सहकारी पतसंसथा मर्या. सातारा मराठा भवन, सदरबझार सातारा, पार्वती नारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कृष्णानगर खेड, श्री. विनायक वैद्यकिय व्यावसायिकांची सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, श्री. सिध्दिविनायक नागरी सह. पतसंस्था मर्या. सातारा, अथर्व नागरी सहकरी पतसंस्था मर्या. सातारा.