सातारा जिल्ह्यातील प्रारुप गट अन् गण रचना जाहीर


दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । सातारा । सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होत असून सोमवारी 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांचा प्रारुप आराखडा जाहीर झाला आहे. यामध्ये अनेक तालुक्यांत गट आणि गणात मोडतोड झाली असून नावेही बदलली आहेत. तसेच काही ठिकाणी गावांची अदलाबदलही झाली आहे.

त्यामुळे याबाबत आता 21 जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. तर आताच्या निवडणुकीसाठी खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गट वाढले आहेत.

जिल्हा परिषदेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते. जिल्ह्यात 65 गट आणि 11 तालुक्यांत पंचायत समितीचे एकूण 130 गण असणार आहेत. याबाबत प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. यामध्ये बहुतांशी जुन्या गटांची आणि गणांची नावे जैसे तेच आहेत. पण, काही ठिकाणी बदल झाला आहे. तसेच खटाव, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढलेत.

यामुळे या तालुक्यात पूर्वीच्या गट आणि गणात मोडतोड झाली आहे. काही गावे दुसरीकडे तसेच नवीन गट-गणात जोडण्यात आली आहेत. तसेच याच तालुक्यात नवीन गट आणि गण निर्माण झालेत. त्यातील काही पूर्वी गट होते.

आताच्या या प्रारुप रचनेवर नागरिकांना 21 जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्षात सुनावणी होऊन पुढील निर्णय होणार आहे.

… तालुकानिहाय गट अन् गण …

कर्‍हाड

  • पाल – पाल, चरेगाव
  • उंब्रज – उंब्रज, तळबीड
  • मसूर – मसूर, वडोली भिकेश्वर
  • कोपर्डे हवेली – कोपर्डे हवेली, वाघेरी
  • सैदापूर – सैदापूर, हजारमाची
  • वारुंजी – वारुंजी, कोयना वसाहत
  • तांबवे – तांबवे, सुपने
  • विंग – विंग, कोळे
  • कार्वे – कार्वे, गोळेश्वर
  • रेठरे बुद्रुक – रेठरे बुद्रुक, शेरे
  • काले – काले, कालवडे
  • येळगाव – येळगाव, सवादे

सातारा

  • पाटखळ – पाटखळ, शिवथर
  • लिंब – लिंब, कोंडवे
  • खेड – खेड, क्षेत्र माहुली
  • कोडोली – कोडोली, संभाजीनगर
  • कारी – कारी, परळी
  • शेंद्रे – शेंद्रे, निनाम
  • वर्णे – वर्णे, अपशिंगे
  • नागठाणे – नागठाणे, अतित

खटाव

  • बुध – बुध, डिस्कळ
  • पुसेगाव – पुसेगाव, खटाव
  • कातरखटाव – कातरखटाव, दरुज
  • निमसोड – निमसोड, गुरसाळे
  • औंध – औंध, सिध्देश्वर, कुरोली
  • म्हासुर्णे – म्हासुर्णे, पुसेसावळी
  • मायणी – मायणी, कलेढोण

फलटण

  • तरडगाव – तरडगाव, पाडेगाव
  • साखरवाडी पिंपळवाडी – साखरवाडी पिंपळवाडी, सस्तेवाडी
  • विडणी – विडणी, सांगवी
  • गणवरे – गुणवरे, आसू
  • बरड – बरड, दुधेबावी
  • कोळकी – कोळकी, जाधववाडी (फ)
  • वाठार निंबाळकर – वाठार निं., सुरवडी
  • हिंगणगाव – हिंगणगाव, सासवड

खंडाळा

  • शिरवळ – शिरवळ, पळशी
  • भादे – भादे, नायगाव
  • खेड बुद्रुक – खेड, बावडा

जावळी

  • कुसुंबी – कुसुंबी, आंबेघर त. मेढा
  • कुडाळ – कुडाळ, सायगाव
  • म्हसवे – म्हसवे, खर्शी बारामुरे

माण

  • आंधळी – आंधळी, मलवडी
  • बिदाल – बिदाल, वावरहिरे
  • मार्डी – मार्डी, वरकुटे म्हसवड
  • गोंदवले बुद्रुक – गोंदवले बुद्रुक, पळशी
  • कुकुडवाड – कुकुडवाड, वरकुटे मलवडी

कोरेगाव

  • पिंपोडे बुद्रुक – पिंपोडे बुद्रुक, सोनके
  • वाठार स्टेशन – वाठार स्टेशन, अंबवडे सं. वाघोली
  • सातारारोड – सातारारोड, किन्हई
  • कुमठे – कुमठे, ल्हासुर्णे
  • एकंबे – एकंबे, साप
  • वाठार किरोली – वाठार किरोली, आर्वी

महाबळेश्वर

  • तळदेव – तळदेव, कुंभरोशी
  • भिलार – भिलार, मेटगुताड

पाटण

  • गोकूळ तर्फ हेळवाक – गोकूळ, कामगरगाव
  • तारळे – तारळे, मुरुड
  • म्हावशी – म्हावशी, चाफळ
  • मल्हारपेठ – मल्हारपेठ, नाडे
  • मारुल हवेली – मारुल हवेली, नाटोशी
  • मंद्रूळ कोळे – मंद्रूळ कोळे, सणबूर
  • काळगाव – काळगाव, कुंभारगाव

वाई

  • यशवंतनगर – यशवंतनगर, अभेपुरी
  • बावधन – बावधन, शेंदूरजणे
  • ओझर्डे – ओझर्डे, केंजळ
  • भुईंज – भुईंज, पाचवड


Back to top button
Don`t copy text!