दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । मुंबई । सम्यक कोकण कला संस्था (रजि.) या संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे उपकार्याध्यक्ष व कोकण विभाग संघटक प्रमुख चिंतामणी रा. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह, विरार येथे संस्थेच्या तथा महाराष्ट्रातील गुणी कलावंतांनी काव्य, गीत गायन आदी कलांच्या माध्यमातून महामानवास मानवंदना अर्पण केली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य अशोकराव जाधव यांनी बुद्धपुजा, सुत्रपठण व सामुदायिक वंदनेनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनोदजी धोत्रे व मुकुंदराव तांबे यांनी केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे गटप्रतिनिधी अजितभाऊ खांबे, समन्वय समिती नालासोपाराचे अध्यक्ष किशोरजी खैरे, गटप्रतिनिधी सुरेशजी मंचेकर, श्रीधर साळवी हे जातीने हजर होते, सम्यक कोकण कला संस्थेचे कार्याध्यक्ष व रिपब्लिकन सेना मुंबई दक्षिणचे भगवान साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, जेष्ठ कवी व महासचिव रामदास तथा राजाभाऊ गमरे, माजी चिटणीस चंद्रमणी घाडगे, चिटणीस मंदारजी कवाडे, सुधाकर मर्चंडे, संघटक संतोष घाडगे आदी मान्यवरांनी उपस्थितांस मोलाचे मार्गदर्शन केले.
वसई, विरार, नालासोपारा, पालघर, डहाणू, ठाणे व संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध संस्थांमधील अशोक महाडिक, अरविंद रुके, अण्णा जाधव, प्रमोद साळवी, दिलीप जाधव, विजय महाडिक, उज्वल खैरे, अशोकराज जाधव, विश्वास जाधव, रुपेश मोहिते, रमेश खैरे, सुनिल येवले, तेजल जाधव, विलास पवार, सुरेंद्र जाधव, मंदार कवाडे, मंगेश साळुंखे, सुदर्शन मोरे, हर्षवर्धन मोरे, हर्षवर्धन जगताप, महेंद्र जगताप, प्रविण कासारे, निखिल गमरे, हर्षद कांबळे, मधुकर राया जाधव, अनिल जाधव, संदीप ओशिवळेकर, किसन खैरे, सदानंद तांबे, सिध्दार्थ तांबे, सदानंद शिर्के, दिनेश मोरे, सुशिल गमरे, राज गमरे, शरद पवार आदी दोन अडीशे कलावंतांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सकाळी ९:०० ते रात्री ९:०० पर्यंत काव्य, गीत, गायन माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमाचे आयोजक मुकुंदराव तांबे, विनोदजी धोत्रे, उदयराज गमरे, महेंद्र तांबे, अजित रिंगणेकर यांनी अत्यंत सुनियोजित पध्दतीने आखणी करून डोळ्याचे पारणे फिटावे असा न भूतो न भविष्यति कार्यक्रम प्रथमच विरार येथे बौद्धजन पंचायत समिती, सम्यक कोकण कला संस्था यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्याची दखल घेतली जात आहे.
सरतेशेवटी आयोजकांनी सर्वच संस्था, उपस्थित मान्यवर, कलावंत, रसिक श्रोतागण यांचे आभार मानले व कवी-गायक अशोक महाडिक यांनी काव्यरत्न दिवंगत रमेशजी यलवे यांच्या “लुकलूकणाऱ्या त्या गगनताऱ्या” या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली.