
दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२४ | फलटण |
‘इंडियन डेंटल असोसिएशन’च्याअंतर्गत बारामती-फलटण शाखेच्या अध्यक्षपदी फलटण येथील डॉ. सौ. तेजस्विता दत्तात्रय देशपांडे यांची सन २०२५-२४ साठी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच फलटण येथील अशोका हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत डॉ. सौ. तेजस्विता देशपांडे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करून नवीन कार्यकारीणीची स्थापना करण्यात आली.
बारामती-फलटण या संयुक्त शाखेच्या नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ. विजय दीक्षित व डॉ. संदीप धायगुडे तर सचिव म्हणून डॉ. नेहा दोशी आणि खजिनदार म्हणून डॉ. केतकी नाळे यांनी पदभार स्वीकारला. याशिवाय डॉ. अशोक व्होरा, डॉ. प्रदीप व्होरा डॉ. राजेंद्र दोशी, डॉ. सुधा शिंदे, डॉ. विश्वराज निकम, डॉ. मनोज गांधी, डॉ. प्रज्ञा गांधी, डॉ. नरेंद्र पवार, डॉ. चेतन गुंदेचा, डॉ. पूजा गुंदेचा, डॉ. प्रितेश दोशी, डॉ. किरण शेंडे, डॉ. काजल शेंडे, डॉ. सौरभ दोशी, डॉ. सोनिया शहा, डॉ. दिपक दोशी, डॉ. शिल्पा दोशी, डॉ. नेत्रा शिकंची, डॉ. मानसी अरोरा, डॉ. गौरी दिक्षित, डॉ. प्रियांका राऊत, डॉ. स्नेहल भुजबळ, डॉ. अमित यादव, डॉ. वैशाली कोकरे, डॉ. मनिषा काकडे व डॉ. मनाली गांधी आदींचा समावेश करण्यात आला आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तेजस्विता देशपांडे यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दंतचिकित्सा शिबिरे, मौखिक आरोग्याविषयी समाजामध्ये जागरुकता, दंत चिकित्सेतील आधुनिक तंत्र-ज्ञानाबद्दल विविध तज्ज्ञांची व्याख्याने यांच्या आयोजनाबरोबरच कौटुंबिक स्नेहमेळावे, सहल यांचेही आयोजन करणार असल्याचे सांगितले.
नूतन कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे फलटण शहर व तालुक्यातील दंतवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.