“एक पणती आरोग्यासाठी लावा” राष्ट्र संवर्धन संस्थेतर्फे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात डॉ सौ.सुचित्रा काटे यांचे आवाहन….


दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । फलटण । राष्ट्र संवर्धन संस्थे तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला सातारा येथील पहिल्या महिला आयर्नमॅन डॉ सौ सुचित्रा काटे प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या . संस्थेतर्फे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो.यंदा या कार्यक्रमाला आयर्नमॅन डॉ सौ सुचित्रा काटे ,संस्थेचे अध्यक्ष सातारा येथील उद्योजक श्री गोविंदराव लेले , सेक्रेटरी श्री अशोक रेमजे रा. स्व संघाचे मा.जिल्हा संघचालक डॉ सुभाष दर्भे ,जिल्हा सहकार्यवाह श्री संदीप आठल्ये , तालुका कार्यवाह श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ सौ सुचित्रा काटे यांनी पूर्ण केलेल्या आयर्नमॅन स्पर्धेचे अनुभव कथन करताना सांगितले की ” आज काल धावपळीच्या जगात स्वतःचे आरोग्य टिकवणे फार महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांना अनेक आघाड्यांवर काम करावे लागते त्यामुळे त्यांनी स्वतःचे आरोग्याबाबत जागृत असणे आवश्यक आहे ,स्वतःसाठी किमान एक तास दिला तर आरोग्य संपन्न आयुष्य जगता येईल .महिलांचे स्वास्थ्य उत्तम राहिले तर आपोआप कुटुंबाचे स्वास्थ्य उत्तम राहील. अशा अनेक उत्तम आरोग्य असणाऱ्या कुटुंबांमुळे समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहील. दीपोत्सवाच्याच्या निमित्ताने “एक पणती आरोग्याची लावा ” असे आवाहन त्यांनी केले.

आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करताना आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी कशी मात केली आणि यश मिळवले याचे त्यांनी सविस्तर वर्णन या वेळी उपस्थितांसमोर केले. कार्यक्रमाला अनेक उद्योजक , व्यापारी, सेवा संस्था प्रतिनिधी ,मोठ्या संख्येने महिला व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वैदेही कुलकर्णी यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सौ.आसावरी इनामदार ,गिरीश बोंद्रे,राम थिटे, यांनी विशेष प्रयत्न केले.


Back to top button
Don`t copy text!