डॉ.सुभाष वाघमारे यांना पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । सातारा । येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,यांच्या ‘ संविधानाच्या स्वप्नातलं गाव’या कवितासंग्रहास २०२१ चा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा साहित्य पुरस्कार रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर व कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन राजगुरुनगर [खेड] येथील पंचायत समितीच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी व्यापीठावर म. सा. प.जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, अड.सतीश गोरडे,मधुकर गिलबिले,कार्यक्रम मुख्य संयोजक, म. सा. प.राजगुरुनगर अध्यक्ष संतोष गाढवे,कवी विजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.  समाजात घडत असलेल्या घटनावर, अन्यायी व्यवस्थेविरुद्ध , शोषण,समाज विघातक गोष्टी विरूद्ध साहित्यिक यांनी बाजू मांडली पाहिजे,समाज हिताच्या गोष्टी साठी त्यांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले .यावेळी कवी लक्ष्मण महाडिक नाशिक,संदीप धावडे अमरावती ,उत्तम सावंत सांगली,सौ. माधुरी विधाटे चिंचवड,सौ .संजीवनी बोकील पुणे, आबा पाटील बेळगाव, श्रीकांत ढेरंगे संगमनेर, प्रवीण पवार धुळे, सौ मनीषा पाटील सांगली,यांच्या कवितासंग्रहानादेखील पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. तसेच पालघरचे निलेश बाळाराम पाटील यांना स्व. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त कवींच्या कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रम संयोजन  उपाध्यक्ष सदाशिव आमराळे, कोषाध्यक्ष नंदा भोर, बाबाजी शिंदे,प्रल्हाद शिंदे,विजय चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक संतोष गाढवे, सूत्रसंचालन धर्मराज पवळे,आभार सतीश गोरडे यांनी मानले. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या संविधानाच्या स्वप्नातलं गाव पुरस्कार देण्यात आल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,कॉलेजचा स्टाफ ,विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!