समता भूमीवर फुले एज्युकेशन तर्फे हरियाणा, कुरुक्षेत्र चे डॉ.सुभाष सैनी सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२३ । पुणे । फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि.9 जुलै 23 रोजी सायंकाळी 6 वाजता समता भूमीवरील फुले वाडा येथे  हरियाणा कुरुक्षेत्र येथील विश्वविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख, देश हरियाणा मासिकाचे  संपादक डॉ.सुभाष सैनी यांनी अनेक संत ,महापुरुष यांच्यावर पुस्तके तसेच जाती निर्मूलन, दलीत मुक्ती आंदोलन संस्कृती,शिक्षण असे विविध विषयावर  हिंदी भाषेत  पुस्तके प्रकाशित व संपादित केली असून त्यांनी जनप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे.फुले आंबेडकर यांचे विचार आचार ते कृतिशील कार्य करून समाजसेवा करीत आहे म्हणून माजी निवृत्त अधिकारी व जेष्ठ लेखक बाबुराव माळी यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी,महात्मा फुले उपरणे देऊन तसेच  संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी फुले दाम्पत्य ग्रंथ भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉ.सैनी याना लेखक बाबुराव माळी यांनी फुले विचाराची ज्योत सावित्री आणि सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा फुले आणि पिंपरी चिंचवडचे दैनिक प्रभात चे पत्रकार सत्यशोधक योगेश घाडगे यांनी शाल व  शासनाचे सावित्रीबाई फुले समग्रा वाडमय ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
या या सत्कारास उत्तर देताना डॉ. सुभाष सैनी म्हणाले की ज्या ठिकाणावरून फुले दंप्तीने ऐतिहासिक कार्य करून समाजसेवा केली त्या समता भूमी वर माझा हा सन्मान करून आपण आणखी जबाबदारी टाकली आहे.ती शक्ती प्रेरणा व ऊर्जा माझ्यासह इतरांना देखील मिळो ही आशा व्यक्त केली.
तर सत्यशोधक ढोक म्हणाले की डॉ.सैनी यांचे काम पाहून कुरुक्षेत्र येथील सावित्री ज्योतिबा ग्रंथालयास आमच्या संस्थेच्या  वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा तीन फुटी पुतळे तसेच 71 महापुरुषांचे ग्रंथ मा.नामदार छगन भुजबळ यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भेट दिले होते आणि आज शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खरे सत्यशोधक म्हणून गौरव करताना आम्हास आनंद होत आहे.दुसरे विशेष म्हणजे त्यांनी सावित्रीबाई  या फुले वाड्यातून भिडे वाड्यात चालत कशा,कोणत्या संकटाला सामना करीत , गल्लीतून पायी जात हे दिव्य कसे झेलले ती वाट देखील डॉ.सैनी यांनी प्रत्यक्ष पायी चालून त्या अर्थाने अनुभव घेऊन मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली त्या शाळेची आजची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली.त्यांनी ती शाळा पुरववत चालू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन सत्यशोधक ढोक यांनी केले तर आयोजनासाठी मोलाची मदत सत्यशोधक पत्रकार योगेश घाडगे,लहू अनारसे,अनिस चे नांदेड प्रमुख श्रीनिवास यांनी केली तर समताचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुलाल माळी यांनी आभार मानले. या नंतर सर्वांना डॉ.सैनी यांचे एक जलती  मशाल सत्यशोधक महात्मा फुले आणि ढोक यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई ,महात्मा फुले गीत चरित्र भेट दिले.त्या नंतर सर्वांनी लहुजी वस्ताद तालीम देखील पाहिली.

Back to top button
Don`t copy text!