केळी व्यवस्थापनाबाबत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढवळला प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । बारामती । येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ढवळ (ता. फलटण) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत केळी फळ व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिक घेतले.

या प्रात्यक्षिकात केळीच्या घडावरील कोरडी पाने काढणे, खालील बोटे काढणे, नर फुल काढणे, व घड झाकण्याचे महत्त्व याबाबत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात वेदांत भापकर, अथर्व कुंभार, विश्वस कोळपे, शिवराज लकडे, आयुष फऱाटे, निखिल निमसे, यश भोसले आणि सार्थक भगत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शेतकर्‍यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!