दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । नागपूर । अभिव्यक्त होण्यासाठी विचारपीठाची गरज असते. ते परिवर्तन विचार मंचा ने पुढाकार घेऊन आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. आम्हाला बलशाली व मोठे व्हायचे असेल तर सतत संघर्ष व त्याग केल्या शिवाय पर्याय नाही. असे विचार प्रा. भीमराव गायकवाड यांनी केले.ते मंचाने आयोजिलेल्या परिवर्तन मेळाव्याच्या अध्यक्षस्थनावरून बोलत होते. सर्वांनी परिवर्तन विचाराच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवावी असे आवाहन केले.हा मेळावा विश्वकर्मा नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या सभागृहात काल रविवारी झाला.
मेळाव्याचे उदघाटन डॉ.नीरज बोधी यांनी केले, अतिथी विलास गजभिये, डॉ. अशोकानंद देशभ्रतार, संध्या भगत, डॉ. सुशील मेश्राम, सुजाता लोखंडे, अन्नपूर्णा दुपटे, डॉ. वीणा राऊत, मधुकर गजभिये ,माधुरी लोखंडे आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ. वीणा राऊत म्हणाल्या, महिलांची प्रगती पाहून समाजाची प्रगती आंकता येते. त्यासाठी परिवर्तन मंच कार्य करीत आहे. त्यांनी परिवर्तन अंक घेवून प्रचार-प्रसार कारण्याकरिता समूहाने पुढे जाण्याचे आवाहन केले. मधुकर गजभिये लिखित रमाई” व “परिवर्तन” अंकाचेे यावेळी प्रकाशन करण्यात आले. गावाकडील वाचकांसाठी पुस्तके भेट देण्यात आली . पत्रकार चंद्रशेखर महाजन यांनी ग्रंथ भेट स्वीकारली आणि आपले मनोगत व्यक्त केले. “लेखनशैली आणि भूमिका” यावर भाष्य करतांना सुजाता लोखंडे आपल्या प्रबोधनात म्हणाल्या, लेखकाला आपले विचार प्रभावी भाषेत मांडन्याकरिता चिंतन-मनन शिवाय प्रचंड वाचन आवश्यक असते. त्यात लेखकाची संवेदना जुडली तरच त्यांचे लिखाण व विचार दीर्घ काळापर्यंत टिकून राहते. प्रत्येकाची लेखनशैली वेगळी असते. एका विशिष्ट विचारधारेवर तो लिखाण करीत असतो. कवितेमध्ये विचार कमी शब्दात मांडने फार कठीन आहे. लेखन कौशल एक साधना असून ती टप्प्या टप्प्याने विकसित होत असते. संध्या भगत म्हणाल्या ,दीड दिवसाची शाळा केलेला एक गावकरी मुलगा कष्टसाध्य श्रम करून कालांतराने साहित्य सम्राट बनतो, त्यांचे लिखान 27 भाषेत अनुवादित झाले, इतकेच नव्हे तर कित्येक चित्रपट देखील तयार झाले, अन्नाभाऊ खरोखरच समाजाकरिता भूषण आहेत. डॉ. अशोकानंद देशभ्रतार यांनी शंकरराव खरात आणि अन्नाभाऊ साठे या दोन्हीं साहित्यिकांच्या जीवनकार्यावर समीक्षात्मक प्रकाश टाकला. डॉ. अशोकानंद पुढे म्हणाले की लेखक खरात यांच्या वडिलाला आलेल्या पत्राचे वाचन करण्याकरिता एका शिक्षकाकडून पंधरा दिवसाच्या स्वयंपाकाकरिता पुरतील एवढे लाकडे फोडावे लागतात. हे खरोखरच विदारक सत्य आहे. हे सत्य लक्षात घेता बाबासाहेबांनी दिलेला शिक्षा, चेतवा, संघटनेचा मंत्र आम्हाला आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. डॉ. अशोकानंद पुढे मीमांसा करीत म्हणाले “खरात आणि साठे हे दोन्ही साहित्यिक अंतराष्ट्रीय ख्यातिचे आहेत. पदमश्री पुरस्काराला पात्र आहेत पण त्यांना शासनाने दुर्लक्षित का केले याचे आश्चर्य वाटते. शिवतरकर-पी.बालू-जगजीवनराम तसेच पेरियार रामास्वामी जे आधी बाबासाहेबाच्या मताचे होते, बाबासाहेबा बरोबर धम्मदीक्षा घेतली असती तर आज बहुसंख्याक बौध्द झाले असते. आणि आज सत्तेत येऊन आपला पराक्रम तर गाजविला असता शिवाय वंचितांवर अन्याय औषधापुरता देखील नसता.”
यावेळी विलास गजभिये यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात शंकरराव खरात यांच्या जन्मभूमीत शताब्दी साहित्य संमेलन निमित्त झालेल्या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती दिली. डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी समारोप आणि साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंती पूर्व संध्या ला मेळावा आयोजित फुले शाहू आंबेडकर साहित्य विचारांची ज्योत तेवत ठेवा असे प्रतिपादन केले.
रत्ना मून , संध्या भगत, माधुरी लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर खुशबू कल्चर आर्ट अकादमी निर्मित मालती वराडे दिग्दर्शित पंचशील नाट्यछटा सादर करण्यात आली.यात मृणाल गणवीर, रत्ना मून, जया कलिहारी, माया थोरात, सुनंदा गायकवाड, मालती वराडे, माधुरी लोखंडे , सुनीता रामटेके आदींचा सहभाग होता. माधव जांभुले आणि त्यांचा संच यांनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी नरेश मेश्राम,मधुकर गजभिये ,संध्या भगत,अन्नपूर्णे दुपटे,प्रा. भीमराव गायकवाड, माया थोरात,मालती वराडे यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर नरेश मेश्राम,भूपेश वराडे उपस्थित होते. संविधान प्रास्तविका वाचन डी.डी. गोंडाणे,,भूमिका डॉ.सुनंदा जुलमे , सूत्र संचालन रंजना लोखंडे आभार सुनंदा गायकवाड यांनी केले . दुसऱ्या सत्रात कवी संमेलन प्रकाश बावनगडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विशेष अतिथी सुभाष मानवटकर,विनायक इंगळे, सूत्र संचालन मनोहर गजभिये होते.आभार तारा पाटील यांनी केले. डॉ.मनीष वानखेडे,अरविंद पाटील, रमेश गजभिये, पुष्पा गजभिये,संजय सायरे, भूषण भस्मे, दादाराव पाटील आदी उपस्थित होते