दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । बारामती । भारताचे फीफा स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट डॉ. रोहन अकोलकर इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वैद्यकीय व वैज्ञानिक कमिशनचे अध्यक्ष डॉ उगुर एडर्नर यांनी भारताचे फिफा फुटबॉल स्पोर्ट्स मेडिसीन प्रमाणित तज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ रोहन रामचंद्र अकोलकर यांचे स्वागत व अभिनंदन केले. रोशन स्विझर्लंड येथे आयोजित पाच व सहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अकराव्या ओलंपिक क्रीडापटूंचा कार्डिओ व्हॅस्क्युलर फिजिकल चेकअप परिषदेत डॉ रोहन अकोलकर सहभागी झाले होते. या परिषदेत ऑलम्पिक खेळाडूंच्या आरोग्य तपासणी बाबत नियम तयार करण्यात आले. फिफा फुटबॉल एक्स्पर्ट स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट म्हणून खेळाडूंना होणाऱ्या इंजुरीज कश्या प्रकारे टाळता येतील व त्या वरील उपचार ही भूमिका होती.
लक्षणीय बाब म्हणजे डॉ रोहन अकोलकर हे भारताचे पहिले फिफा वर्ल्ड कप मेडिसिन एक्सपर्ट आहेत आणि त्यांना इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीने फुटबॉल मेडिसिन चे सदस्य नियुक्त केले आहे.
ही बाब एक विश्व् कीर्तिमान आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्या बद्दल डॉ रोहन अकोलकर यांचे अभिनंदन करण्यात आले. इन्टरनेशनल ओलिम्पिक कमिटी चे स्पोर्ट्स मेडिसिन यांनी डॉ अकोलकर यांच्या कार्याचे कौतुक केले.