डॉ.रामराजे माने देशमुख याना ग्लोबल फौंडेशनचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मधील भूगोल विभागाचे प्राध्यापक व छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.रामराजे शिवाजीराव माने देशमुख ,यांना ग्लोबल फौंडेशन इंडिया  या संस्थेकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २१ एप्रिल २०२३ येथे मुधोजी कॉलेज फलटण येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत व्यावसायिक गुणवत्ता व ते देशाच्यासाठी करीत असलेले निस्वार्थी सेवाकार्य याची दखल घेऊन ग्लोबल फौंडेशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ.प्रवीण सप्तर्षी व श्रीलंकेतील लाल मरवीन धर्मश्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव  व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर, महाविद्यालयाचा स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!