स्थैर्य, दहिवडी, दि. १२ (विनोद खाडे) : सहा महिन्यापूर्वी कोरोना नावाने मनात धडकी भरायची. मुंबईत तर कहरच होता. मुंबई मधील लोक गाव गाठत होते.अशात आमचा डॉक्टर पण गावाकडे आला. कोरोना ला जंतू म्हणायचा. सगळंयासारख त्यांचाही स्वतःवर जास्त जीव. सुरूवातीला कोरोना गेल्याशिवाय मुंबईला जाणार नाही अशी खूनगाठ बांधलेली ,पण एकदा जबरदस्तीने मुंबई ला जावं लागलं.मुंबई परिस्थितीची भयानकता पाहून मुंबई मध्ये स्वतःच कोरोना हाॅस्पीटल सुरू केल. पहिलं ४० बेडच हाॅस्पीटल तीन दिवसात फुल झाल. परत ४० बेडच दुसर,७०बेडच तिसर आणि म्हसवड येथे ३० बेडच चौथ हाॅस्पीटल सुरू केले.हा प्रवास खुप कष्टान केला. रोज वेगळे प्रसंग आणि लोकांचे अनुभव थक्क करणारे होते. एकजण तर शेवटच्या स्टेजला आला दहा दिवसात बरा झाला बील भरलं आणि त्याच बिलाची तक्रार केली,ज्या इमारतीत हाॅस्पीटल होती त्यानी हाॅस्पीटल बंद करण्यासाठी फौजदारी केली, डॉक्टर व कर्मचारी आगाऊ वेतनाशिवाय काम करत नव्हते,असे एक ना अनेक प्रश्न होते त्याने लिलया पेलले.आम्ही फक्त तू खूप मोठ काम करत आहेस याची जाणीव करून देतो.त्याला काही जण देव समजतात तर काही जणांना पैशासाठी करतोय अस वाटत. एक गोष्ट खात्रीशीर आहे की हा माणसांना जगवण्यासाठी हे करतोय.यातून डॉक्टरांना पैसाच मिळत असता तर शासनाच्या आदेशा आगोदरच कोरोना हाॅस्पीटल सर्वांनी उभारली असती.कोरोना लढाई मधील डॉक्टरांना, हाॅस्पीटल चालवणाराना समजावून घेतल पाहिजे.हाॅस्पीटल सुरू केल्यापासून डाॅक्टरने पाचशे पेक्षा जास्तच लोकांचे जीव वाचवले.आता तो दुप्पट वेगाने काम करतोय. हा योद्धा डाॅ राजेंद्र खाडे हा आहे. तो हे काम प्रामाणिकपणे आणि तळमळीने करतोय. त्याचा व इतर कोरोना योद्धांचा उत्साह कायम रहावा हीच सदिच्छा