
दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2025 | फलटण | येथील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे असणाऱ्या रुग्ण कल्याण समिती अर्थात नियामक समितीच्या आमदार सुचित सदस्य पदी तुलसी एक्सीडेंटल होमचे अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रवीण आगवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. प्रवीण आगवणे यांनी यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून फलटण नगरपरिषदेवर काम केले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवणे आणि रुग्णालयांना येत असलेल्या अडचणी जलद गतीने दूर करण्यासाठी आता उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचे जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हे अध्यक्ष, तर प्रांताधिकारी हे सहअध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत.
– अशी आहे फलटण रुग्ण कल्याण समिती –
-
जिल्हा शैल चिकित्सक (पदसिद्ध, अध्यक्ष)
-
उपविभागीय अधिकारी, फलटण – विकास व्यवहारे (पदसिद्ध, सहअध्यक्ष)
-
वैद्यकीय अधीक्षक – डॉ. अंशुमन धुमाळ (पदसिद्ध, सचिव)
-
आमदार सुचित सदस्य – डॉ. प्रवीण आगवणे
-
पंचायत समिती सभापतींचे प्रतिनिधी – (रिक्त) (पदसिद्ध, सदस्य)
-
नगरपरिषद मुख्याधिकारी – निखिल मोरे (पदसिद्ध, सदस्य)
-
खाजगी डॉक्टर – डॉ. संजय राऊत (पदसिद्ध, सदस्य)
-
स्वयंसेवी संस्थेचा एक प्रतिनिधी – (रिक्त) (पदसिद्ध, सदस्य)
-
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर – (पदसिद्ध, सदस्य)
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण उपजिल्हा रुग्णालयच्या रुग्ण कल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.
– डॉ. प्रवीण आगवणे,
सदस्य, रुग्ण कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय, फलटण.