
दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025। फलटण । शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने दुपारी १२ वाजता DD सह्याद्री वाहिनीवर सांधे दुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार याबाबत फलटण येथील जोशी हॉस्पिटलचे संस्थापक तथा प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद जोशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या विशेष मुलाखतीचे सूत्रसंचालन सौ. मुक्ताताई कुलकर्णी यांनी केले आहे. डॉ. प्रसाद जोशी हे एक अत्यंत अनुभवी अस्थिरोग शल्य चिकित्सक आहेत, ज्यांनी सांधे दुखीच्या समस्यांवरील उपचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सांधे दुखी ही अनेक लोकांना भेडसावणारी समस्या आहे. अशा वेळी डॉ. प्रसाद जोशी यांच्या अनुभवातून होत असलेले उपचार खूप महत्वाचे ठरतात. त्यांनी हाडांच्या पुनर्स्थापना आणि अत्याधुनिक प्रत्यारोपण तंत्रांवर अनेकांना मदत केली आहे. डॉ. जोशी हे मुख्यतः हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी, स्पाइन सर्जरी आणि आधुनिक आघात उपचार या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत.
या विशेष मुलाखतीत सौ. मुक्ताताई कुलकर्णी यांनी डॉ. प्रसाद जोशी यांच्याशी सांधे दुखीच्या समस्या, उपचार पद्धती, रुग्णांच्या अनुभवांवर चर्चा केली आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या प्रत्यारोपण पद्धती आणि त्यातून होणारे लाभ याविषयीही विस्तृत माहिती देण्यात आली आहे. ही मुलाखत DD सह्याद्रीवर शनिवार दि. १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रसारित होणार आहे.