दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुरवली बु. येथे माती व पाणी परिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
माती व पाण्याचे परीक्षण करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनली आहे. माती व पाण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांना समजल्यास पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असे मत माती व पाणी परीक्षण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात यांनी व्यक्त केले.
तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वितरण व विश्लेषणही करण्यात आले.डॉ. मेटकरी-खरात यांनी मातीचे आरोग्य याबद्दल माहिती देऊन मातीचा नमुना परीक्षणासाठी कसा गोळा करावा हे प्रात्यक्षिकासह दाखवले. कृषीसहाय्यक वैभव निंबाळकर यांनीही माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ.राणी सूळ, कृषी सहाय्यक श्री.वैभव निंबाळकर तसेच इतर ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही.लेंभे व डॉ.ए.आर.पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदूत तिवाटणे आदित्य, सणस सचिन, भुजबळ विघ्नेश, टिळे संकेत, राऊत समीर, शिंदे कुणाल, साबळे सौरभ यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.