दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२३ | फलटण |
जान्हवी सामाजिक संस्थेच्या वतीने सचिन यादव (डायरेक्टर, के.बी. ग्रुप कंपनीज् सस्तेवाडी) यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा व खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जान्हवी सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांची पी. एचडी. सॉईलमध्ये झाली असून त्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या कृषी महाविद्यालय फलटण येथे कार्यरत असून शेतकर्यांना माती परीक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. तसेच मृद परीक्षणाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना पिकांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे. तसेच त्या सामाजिक कार्य करत असतात. या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्याचा सचिन यादव (डायरेक्टर, केबी ग्रुप कंपनीज सस्तेवाडी) यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी विविध विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामागिरी केलेल्या गुणवंत सत्कारमूर्ती व पंचक्रोशीतील स्पर्धकांचा व गुणवंत खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी व विविध विभागातील मान्यवर व जान्हवी सामाजिक संस्था अध्यक्ष धनंजय चव्हाण तसेच सरपंच, उपसरपंच, बाळासाहेब सस्ते उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.