दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र फलटणतर्फे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारा ‘परशुराम पुरस्कार’ यावर्षी पुणे येथील ज्येष्ठ माध्यम सल्लागार तज्ज्ञ डॉ. केशव श्रीपाद साठ्ये यांना जाहीर झाल्याचे फलटण केंद्राचे प्रमुख श्री. विजय ताथवडकर यांनी सांगितले.
हा पुरस्कार रविवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे प्राध्यापक विक्रम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली व अॅडव्होकेट अविनाश भिडे, ज्येष्ठ विधीज्ञ अध्यक्ष ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक व प्राध्यापक मनोहर उर्फ शाम जोशी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास सर्व सभासद, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक केंद्राचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी व कार्यवाह सुभाष सबनीस यांनी केले आहे.