
दैनिक स्थैर्य । 24 मार्च 2025। फलटण । येथील डॉ. ओंकार देशपांडे याची 8 व्या राष्ट्रीय इलाइंट वुमन बॉक्सिंग चॅम्पीयनशिपसाठी वैद्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ओंकार देशपांडे सध्या पंजाबमधील नेताजी सुभाषचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मेडिसीन येथे कार्यरत आहेत. ओंकार देशपांडे हे प्रसिध्द डॉक्टर द. ग. उर्फ गोटू देशपांडे व डेंटिस्ट डॉ. तेजस्विता देशपांडे यांचा मुलगा आहे.
नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रीडा सुकल येथे शुक्रवार दि. 21 ते गुरुवार दि. 27 अखेर या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत देशातील नामवंत महिला मुष्टियोध्दा सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनास बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजयसिंग, ऑलिपिक विजेत्या पी. टी. उषा, विजेंदरसिंग, सरिता देवी आदी मान्यवर उपस्थित होते. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.