आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीच्या डॉ.सौ.सुप्रिया कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । आटपाडी । आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउदेशीन संस्थानच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीतील सुप्रसिद्ध व्याख्याता, कवियत्री पर्यावरणप्रेमी, मातृहृदयी, डॉक्टर सौ . सुप्रिया श्रीप्रसाद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पर्यावरण संरक्षण आणि समाज सेवेसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रा सह २६ राज्ये आणि भारतासह १८ देशात आहेत . आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्याच्या निवड समितीच्या निर्णयाद्वारे आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शना खाली डॉ .सौ. सुप्रिया साळुंखे_ कदम यांची ही नियुक्ती झाली आहे.

भारत सरकारच्या निती आयोग, सामाजीक न्याय अधिकारीता मंत्रालय, उद्दम मंत्रालय आयकर विभाग प्रमाणित आणि महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था आहे.

या आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती सुहासिनी म्हाळस्कर भामरे, आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी सौरभ हजारे, राष्ट्रीय सेक्रेटरी दीपक काळे यांच्या सहीने डॉ . सुप्रिया साळूंखे – कदम यांची नियुक्ती केली गेली आहे . प्रत्येकाने ३ झाडे लावून आणि आणखी तिघांना झाडे लावण्यास तयार करण्याचा संदेश देणाऱ्या या पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेत कार्यरत असलेल्या संस्थेच्या पदावरील नियुक्ती बद्दल डॉ .सौ . सुप्रिया कदम यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे . महिला सक्षमीकरण आणि जनजागृती पर व्याख्यान निस्वार्थी समाजकार्यासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ.सौ कदम या आटपाडी आणि विटा येथे कार्यरत असलेले प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ .श्रीप्रसाद कदम यांच्या धर्मपत्नी आहेत.


Back to top button
Don`t copy text!