‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज परिवर्तनाची दिशा’ या विषयावर बुधवारी आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांचे व्याख्यान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १३: महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे हे 14 एप्रिल 2021 रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज परिवर्तनाची दिशा’ या विषयावर 27 वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. 14  एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सत्ताविसाव्या दिवशी अर्जुन डांगळे हे सकाळी 11 वाजता विचार मांडणार आहेत.

अर्जुन डांगळे यांच्याविषयी…

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक मराठी साहित्यावर प्रभुत्व असलेले आणि गेली पाच दशके महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमध्ये अर्जुन डांगळे यांनी सहभाग घेतला आहे. कवी, इतिहासाचा विद्वान वाचक आणि समाज सुधारणेच्या चळवळीचा संवेनदशील माणूस म्हणून श्री. डांगळे यांची ओळख आहे. त्यांनी केवळ आंबेडकरी साहित्य चळवळीलाच हातभार लावला नाही तर पिढ्यानपिढ्या लिहण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. राज्यघटनेत अपेक्षित असलेल्या सामाजिक समतेसाठी ते संघर्षरत आहेत. मराठी साहित्य, समाज सुधारणेच्या चळवळीमधील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

‘छावणी हलते आहे…’ या कवितासंग्रहासह ‘ही बांधावरची माणसं’ हा लघुकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘निळे अधोरेखित’  हे लेख संग्रह आहेत. ‘मैदानातील माणसे’, ‘कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य….. साहित्यिक टिका’, ‘दलित पँथरचा इतिहास’ हे आणखी काही पुस्तके श्री डांगळे यांनी लिहिलेली आहेत.

काही पुस्तकांचे संपादनही श्री. डांगळे यांनी केले आहे. यामध्ये ‘दलित साहित्य : एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  : निवेदक वाड्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड – काळ आणि कर्तृत्व’, ‘विषयुक्त भाकर : दलित साहित्याचे काव्यशास्त्र’,  ‘प्रबुध्द भारत नियतकालिक’ ही पुस्तके  आहेत. 

समाज माध्यमांद्वारे बुधवारी व्याख्यानाचे प्रसारण

मंगळवार, 14 एप्रिल 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!