डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांच्या शोकसंवेदना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “डॉ. देवीसिंह शेखावत हे उत्तम जनसंपर्क असलेले एक लोकप्रिय नेते होते. अमरावतीचे पहिले महापौर तसेच विधान मंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी चांगले काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. दिवंगत डॉ. देवीसिंह शेखावत यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व श्रीमती प्रतिभाताई पाटील व त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो”, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!