डॉ. कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गंगाराम गावडे गुरुजी सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । बारामती येथील ऋग्वेद हेल्थ फाउंडेशनच्यावतीने गोखळी येथील व सध्या हणमंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाराम कृष्णा गावडे यांना डॉ ए.पी.जे.कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या हणमंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाराम गावडे यांनी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थीमध्ये शैक्षणिक आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये हसत खेळत शिक्षण प्रकल्प, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन, स्वछ, सुंदर व आनंदायी शाळा, वाचन कट्टा, गांडूळ खत प्रकल्प, परसबाग, आनंददाई शनिवार असे अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे ही शाळा सर्व सुविधानी युक्त केली आहे. या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन गावडे सर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

गावडे यांनी यापूर्वी मिंडवस्ती, मोहितेवस्ती, धनगरवस्ती (वाई), बागेवाडी या ठिकाणी उत्तम कार्य केले आहे. याबद्दल त्यांचे फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संपकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यासह सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच विक्रमसिंह जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष विठ्ठल चव्हाण आणि गोखळी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे


Back to top button
Don`t copy text!