दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
शेतकर्यांच्या हितासाठी डॉ. जी. एस. चिमा यांनी उद्यानशास्त्रात क्रांती घडवल्याचे प्रतिपादन उद्यान पंडित डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालय, फलटण येथे उद्यान पंडित व भारतीय उद्यान शास्त्राचे पीतामह मानले जाणारे डॉ. जी. एस. चिमा यांची जयंती दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी करण्यात आली. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जी. एस. चिमा यांचा उद्यान शास्त्रातील कार्याचा आढावा, फळबाग व भाजीपाला मधील संकरित वाणाची निर्मिती, शेतकरी हितार्थ करण्यात आलेले उल्लेखनीय कार्य व अधिक उत्पादनशील संकरित वाण, द्राक्ष पिकाची, गणेश व पेरू पिकाची सरदार या वाणांची सविस्तर माहिती देत डॉ. जी. एस. चिमा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शैक्षणिक व संशोधन संबंधित विविध पदांवर कार्यरत राहून उद्यानशास्त्रात क्रांती घडवली, असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी उद्यानशास्त्रामध्ये कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित व संकरित फळबाग व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, शेतकरी हितार्थ उद्यान प्रकल्प या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधन केले. उद्यान विद्या विभागाचे प्रा. ए. डी. पाटील यांनी डॉ. जी. एस. चिमा यांनी विकसित केलेल्या सुधारित व संकरित वाण, विभागानुसार शिफारशीत भाजीपाला व फळे लागवड तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधन केले.
चतुर्थ वर्षातील निकिता अल्हाट हिने उद्यान शास्त्राचे व संकरित वाणांचे महत्त्व, डॉ. जी. एस. चिमा यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या विषयावर मनोगत व्यक्त केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या कार्यक्रमाला श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी, आठव्या सत्रातील विद्यार्थी उपस्थित होते.