
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। सातारा । ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांना मुंबई येथील युआरएल फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली 28 वर्षे सामाजिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती किंवा संस्थांचा सन्मानकरण्याचे कार्य युआरएल फाउंडेशन ही संस्था करत आहे. यंदाच्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची निवड संस्थेच्या विश्वस्तांनी केली आहे. रोख 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.