स्थैर्य, फलटण, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस फलटण येथील छत्रपती शिवाजी वाचनालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी वाचनालयाचे मार्गदर्शक ॲड. दिपक रूद्रभटे, जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे, महादेव माने, सुभाष भांबुरे, किशोर देशपांडे, अकुंश गंगतिरे यांच्यासह शिवाजी वाचनालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.