२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज वाटप सुरु


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गात प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज वाटप सुरु असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरिता सातारा नगरपालिका हद्दिपासून 5 किमी अंतराच्या आतील महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती व नबबौध्द प्रवर्गाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.

संपर्कासाठी पत्ता –  सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003.  फोन नं. 02162-298106


Back to top button
Don`t copy text!