
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । येथील महात्मा फुलेनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस राजू मारुडा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी देवदास वाळा यांच्या हस्ते मुलांना वही पेन वाटप करण्यात आले. यावेळी महिलांतर्फे लहान मुलां मुलींना खाऊ व पुस्तकाचे वाटप करण्यात आले. मनोज मारुडा यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आनंद डांगे, नितीन वाळा, सचिन वाळा, विशाल मारुडा, अमन वाळा, खुशाल वाळा, सौ. सुशिला वाळा, सौ. नंदा मारुडा, श्रीमती संजू वाघेला, सौ. मीनल गलियल, सौ. आरती वाघेला, सौ. मनीषा डांगे, सौ. रिना वाळा, सौ. कोमल वाळा, कुमारी पप्पू सोळंकी व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होता.