सातारा जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. बी. के. यादव यांची निवड


दैनिक स्थैर्य । 1 ऑगस्ट 2025 । फलटण । समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी सातारा जिल्हा महात्मा फुले समता परिषद अध्यक्षपदी डॉ. बी. के. यादव यांची निवड केली.

यावेळी समता परिषदेने बापुसाहेब भुजबळ, सातारा जिल्हा माजी अध्यक्ष दशरथ फुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे फलटण तालुकाध्यक्ष अरविंद राऊत, युवा अध्यक्ष अमोल रासकर, ओबीसी आरक्षण समितीचे गिरीश बनकर, शंकरराव अडसुळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बी. के. यादव यांनी यापूर्वी ओबीसी संघर्ष समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी चळवळ उभी केली आहे. यापूर्वी त्यांनी कॉग्रेस पक्षात ओबीसी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री सुधाकर गणगणे, माजी मंत्री आण्णासोब डांगे त्याचप्रमाणे रासपचे महादेव जानकर यांच्याबरोबर तसेच समता परिषदेचे माजी कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, शंकरराव लिंगे यांचे बरोबर काम केले आहे. त्यांच्या या कामाचा दीर्घ अनुभव विचारात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी ही जबाबदारी सोपविली आहे.

समाजातील उपेक्षित घटकांसाठी आतापर्यंत काम केले आहे. सध्या ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ओ.बी.सी., बी.सी., विमुक्त व भटक्या वर्गासाठी भविष्यात अधिक ताकदीने काम करण्याचे ठरविले आहे. सध्या ना. छगन भुजबळ हे एकमेव जेष्ठ नेते ओबीसी आणि दुर्बल घटकांसाठी संघर्ष करीत असून त्यांच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

खर्‍या अर्थाने सामाजिक समता व बंधुत्व हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी काम करणार आहे. सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी आपण या पदाचा वापर करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!