फलटणच्या डाॅ. अशोक शिंदे यांच्या शोधनिबंधास द्वितीय क्रमांक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । फलटण । शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर (शिविम) व न्यू काॅलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१९९० नंतरची मराठी कादंबरी’ या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने वरील विषयाच्या अनुषंगाने विविध उपविषयावर शोधनिबंध लेखन स्पर्धा ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील बहुसंख्य शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. अशोक शिंदे यांच्या ‘नवदोत्तरी मराठी कादंबरीतील कृषी जीवन’ या विषयावरील शोधनिबंधास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

नवदोत्तरी काळात काही कादंबरीकारांनी आपल्या कांदबरीतून शेतीशी संबंधीत विविध समस्या मांडल्या आहेत. आस्मानी व सुलतानी संकटांबरोबरच राजकारण, औद्योगीकीरण, यांत्रिकीकरण अनियंत्रित बाजारभाव व कौटुंबिक कलह अशा समस्याचे चित्रण या कादंबरीतून प्रकट झालेले आहे. या समस्यांमुळे कृषी जीवन कशाप्रकारे प्रभावित झाले आहे याची मांडणी या शोधनिबंधात केलेली डाॅ. शिंदे यांनी केली आहे.

दि. २५ फेब्रुवारी रोजी शिविमच्या अकराव्या अधिवेशनानिमित्त आयोजित या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या शुभहस्ते डाॅ. शिंदे यांना या बक्षीसाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिविमचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश दुबळे, अधिवेशन अध्यक्ष डाॅ. अनिल गवळी, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ. दत्ता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. शिंदे यांच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती फलटणचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा निवृत प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासनाधिकारी तथा निवृत्त प्राचार्य अरविंद निकम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पंढरीनाथ कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!